Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावनशिराबाद जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळा न. 2 येथे बालीका दिन साजरा

नशिराबाद जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळा न. 2 येथे बालीका दिन साजरा

नशिराबाद जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळा न. 2 येथे बालीका दिन साजरा

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-   नशिराबाद येथे दि.3 जानेवारी रोजी बालिका दीन निमित्त जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळा न. 2 मध्ये बालिका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमात सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर इयत्ता 5वी ची विद्यार्थिनी सादीया फातेमा हिने सावित्री बाई फुले यांच्या जीवनपटा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळा न. 2 च्या मुख्याध्यापिका सुलताना बी अताउल्लाह खान यांनी सावित्री बाई फुले आणि फातिमा शेख यांच्या मैत्री आणि शिक्षण क्षेत्रात केलेले उलेखनीय कार्य बद्दल मुलींना माहिती दिली. दरम्यान दोन मुलींना सावित्री बाई दत्तक पालक योजना अंतर्गत 360 रुपये चे चेक त्यांच्या पालकांच्या समक्ष शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक वृदांनी मोलाची साथ दिली.कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या