Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमकोरपावली येथील तरुण शेतकऱ्याच्या नावाचे इंस्टाग्रामवर तयार केले बनावट अकाऊंट; मुलीची केली...

कोरपावली येथील तरुण शेतकऱ्याच्या नावाचे इंस्टाग्रामवर तयार केले बनावट अकाऊंट; मुलीची केली बदनामी..!

यावल /प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-– यावल तालुक्यातील कोरपावली येथील एका तरूणाच्या नावाचा व फोटो वापरून बनावट इंस्टाग्रामवर खाते तयार करून त्यांच्या मुलीची समाजात बदनामी केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजता उघडकीला आला आहे.याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली गावातील एका शेतकरी तरूणाचा फोटो व नावाचा वापर करून अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्यावेळी तरूण शेतकऱ्याच्या मुलीच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान टाकून तिची बदनामी केली.हा प्रकार २३ सप्टेंबर रोजीपासून ते मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूण शेतकऱ्याने तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधार कानडे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या