Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावबंद घरात चोरी करणाऱ्या आरोपीस सुरत येथून अटक; तर दोन जणांना जळगावातून...

बंद घरात चोरी करणाऱ्या आरोपीस सुरत येथून अटक; तर दोन जणांना जळगावातून घेतले ताब्यात..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगावात  बंद घरात चोरी करणाऱ्या आरोपीस सुरत येथून अटक केली आहे तर दोन जणांना जळगावातून घेतले अटक करण्यात आली आहे. शहरातील तांबापुरा भागात पटेल गल्ली येथे राहणारी वयोवृध्द महिला तसलीमबी मोहम्मद सैय्यद, वय 60 वर्षे, या बकरी ईद सणानिमित्त दि 26 जून ते दि.8 जुलै पर्यंत धुळे येथे त्यांच्या मुलीकडे गेलेल्या असतांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे घराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करुन 23 हजार रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने आणि 25 हजार रु रोख असा एकूण 48 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबतीत तसलीमबी मोहम्मद सैय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिनांक 8 जुलै रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा आणि गुन्हयातील गेल्या मालाचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना ही घरफोडी करून चोरी करणारा सराईत गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली आहे. त्याच्या बरोबर त्याचे साथीदारही होते. तो आता सुरत येथे लपून बसलेला आहे, अशी माहिती मिळाली. म्हणून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील सचिन पाटील,मुकेश पाटील, छगन तायडे यांचे पथक सुरत येथे रवाना करुन या पथकाने आरोपी इश्तीयाक अली राजीक अली यास ताब्यात घेतले. तसेच त्याचे साथीदार हसीनाबी राजीक अली, वय 55 वर्ष, रा. शाहअवलीया मशीद जवळ, तांबापुरा, जळगाव, अनिस हमीद शेख, वय 31 वर्ष, रा. रुबी अपार्टमेंट, प्लॅट नं. 4, डी. मार्ट जवळ, शिरसोली नाक्याजवळ, जळगाव तसेच एक विधी संघर्ष बालक यांना तांबापुरा भागातून अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याच्याकडून गुन्हयातील गेल्या मालापैकी 5 हजार रुपये रोख, 5 हजार रुपये किंमतीचे 100 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पायातील साखळ्यांचा जोड,12 हजार रुपये किंमतीची 4 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी यांच्याकडून अजून काही चोरी, घरफोडी उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री. हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दीपक जगदाळे, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, अल्ताफ पठाण, सचिन मुंढे, मुकेश पाटील, छगन तायडे, योगेश बारी अशांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या