अमळनेर /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- अमळनेर शहरातील बसस्थानकावर बसमध्ये चढत असणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून पैसे लांबवणाऱ्या चाळीसगाव येथील महिला चोरास पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील प्रियदर्शनी नगरातील रहिवासी भीमराव सोनू बिऱ्हाडे हे दि ११ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अमळनेरहून दोधवद ( हिंगोणे) येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एका महिलेने त्यांच्या खिश्यात हात घालून सहाशे रुपये काढत असताना बि-हाडे यांनी हात पकडला. मात्र महिलेने हात झटकून पळ काढला.
त्यावेळी बसस्थानकावरील लोकांनी तिला पकडले. पोलीस चौकीतील महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे, अशोक कुमावत, निलेश मोरे यांनी तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने तिचे नाव संगीता विष्णू लोंढे (वय ४५, रा. इंदिरानगर चाळीसगाव) असे सांगितले. बि-हाडे यांच्या फिर्यादीवरून संगीताबाईसह अज्ञात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.