Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावनवऱ्याची दारू बायकोने पिली..नवऱ्याने पट्ट्याने मारहाण करत आवळला बायकोचा गळा...!

नवऱ्याची दारू बायकोने पिली..नवऱ्याने पट्ट्याने मारहाण करत आवळला बायकोचा गळा…!

हतनूर येथील खळबळजनक घटना

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण परिसर येथे सुरू असलेल्या वाढीव नऊ दरवाजांच्या कामासाठी मजूर आलेले असून त्यातील एक आलेल्या मजुराने त्याच्या स्वतःसाठी पिण्यास आणलेली दारू पत्नीने पिल्याने त्याचा त्याला राग आल्याने त्याने तिला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून तिचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. हा प्रकार शवविच्छेदनानंतर उघडकीस आला आहे. सुरुवातीला पोलिसांना चौकशीत सर्पदंशाचा बनाव करणाऱ्या पतीचे पितळ डॉक्टरांच्या शवविच्छेदन अवहलानंतर उघडले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खून झालेल्या विवाहितेचे नाव शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम (वय ४०, रा. राजकिसन कॉलनी, ता. शक्तीनगर, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) असे आहे. हतनूर धरण येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून चालू आहे. या ठिकाणी परप्रांतातील मजूर कामासाठी राहतात. जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी हे दाम्पत्यदेखील या ठिकाणी मजुरीचे काम करतात. रविवारी दुपारी जितेंद्र गंगाराम हेमब्रम (वय २५, रा. राजकिसन कॉलनी, ता. शक्तीनगर, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) याने स्वतः साठी आणलेली दारू पत्नी व शेजारी राहणाऱ्या करणी शिवराम यादव या दोघांनी पिल्याने संशयित जितेंद्र गंगाराम हेमब्रम याला राग आला. याचा जाब विचारत त्याने पत्नी शांतीदेवीला रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जबर मारहाण केली.नंतर दारूच्या नशेत तिचा गळा दाबला. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून त्याने रुग्णालयात आपल्या पत्नीला सायंकाळी साप चावल्याचे कारण डॉक्टरांना सांगून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले.पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश उगले यांना मयत महिलेच्या अंगावर साप चावल्याचे कोणत्याही प्रकारच्या खुणा दिसून आल्या नाहीत. यामुळे सोमवारी सकाळी मयत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये डॉक्टरांना गळा दाबला असल्याचा प्रकार लक्षात आला. व त्यामुळे खून झाल्याचे उघड झाले. पोलीस हवालदार नावेद अली यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र गंगाराम हेमब्रमवर वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाअसून सहा. निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या