भडगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात गाड्यांच्या बॅटरी चोरीचे प्रमाण वाढतच असून नशिराबाद परिसरातही 3 ते 4 बॅटरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.या मुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.पण अशातच दि.२१ ते २२ जून दरम्यान भडगाव शहरातील समीर स्कूल ग्रीनपार्क परिसरासह इतर भागात आयसर, ट्रॅक्टर व चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. सदर प्रकरणी फिर्यादी नासिरखान रशिदखान (वय ५२, रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक.फौ.प्रदीप चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे (पाचोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना भडगाव शहरातील समीर शेख कदीर शेख व शायन शेख मुनव्वर या दोघांकडे संशयाचा तपास केंद्रित करण्यात आला.२२ जून रोजी रात्री ९.११ वाजता दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गाड्यांच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या एकूण ९ वाहनांच्या बॅटऱ्या आणि एक दुचाकी असा एकूण ६३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेला ( बॅटरी ) मुद्देमाल:
१. आयसर गाडी (MH-18 AA 7498) – ₹6000
२. आयसर गाडी (MH-18 BA 1170) – ₹6000
३. ट्रॅक्टर (MH-22 7118) – ₹5000
४. दोन ट्रॅक्टर (MH-19 P 6020 / MH-19 1468) – ₹10,000
५. आयसर गाडी (MH-20 BE 1400) – ₹5000
६. आयसर गाडी (MH-05 FJ 8251) – ₹5000
७. आयसर गाडी (MH-19 CY 8767) – ₹5000
८. आयशर गाडी (MH-04 DS 0464) – ₹5000
९. आयसर गाडी (MH-18 AA 1653) – ₹6000
१०. TVS वेगो दुचाकी (MH-04 FX 1247) – ₹10,000
एकूण जप्त रक्कम: ₹63,000/-
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली सफौ. प्रदीप चौधरी, पोहेका निलेश ब्राह्मणकार, पोको प्रविण परदेशी, पाको अमजद पठाण, पोकॉ सुनिल राजपूत आदींच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.