Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याबिबट्याच्या हल्ल्यात सावदेत म्हशीचा पारडू ठार ; शेतकऱ्याचे २० हजारांचे नुकसान

बिबट्याच्या हल्ल्यात सावदेत म्हशीचा पारडू ठार ; शेतकऱ्याचे २० हजारांचे नुकसान

भडगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भडगाव येथील सावदे गावात बिबट्याच्या हल्ल्याची गंभीर घटना नुकतीच घडली आहे. येथील शेतकरी चतरसिंग परदेशी यांच्या शेतात असलेल्या म्हशीच्या पारडूवर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. नेहमीप्रमाणे सकाळी म्हशीचे दूध काढण्यासाठी शेतात गेले असता परदेशी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असल्याने हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेत परदेशी यांचे सुमारे २० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सावदे व परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तत्काळ लक्ष घालून या भागात मुक्तसंचार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या