Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभडगाव: काळाबाजारात जाणारा २५ टन युरिया पकडला ; कृषी विभागाची थरारक कारवाई..!

भडगाव: काळाबाजारात जाणारा २५ टन युरिया पकडला ; कृषी विभागाची थरारक कारवाई..!

भडगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येणारा युरिया खत तस्करीच्या माध्यमातून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा प्रकार कृषी विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. भडगाव–कजगाव–चाळीसगाव–हीरापूर मार्गावर थरारक पाठलाग करून (एम.एच. ४१ एजी ४०४१) क्रमांकाचा ट्रक पकडण्यात आला असून, ट्रकमधील तब्बल २५ मेट्रिक टन युरिया खत जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भडगाव येथील स्वामी अॅग्रो या कृषी सेवा केंद्राचा चालक राकेश पाटील याने कोणताही वैध परवाना नसताना युरिया खत नाशिक जिल्ह्यातील एका कृषी सेवा केंद्राकडे बेकायदेशीररीत्या पाठविल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक नाशिक सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची कारवाई करण्यात आली.भरारी पथकाचे अध्यक्ष पद्मनाभ म्हस्के (कृषी विकास अधिकारी) यांच्यासह विकास बोरसे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक), दिगंबर तांबे (तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भडगाव), निखील टोळकर (तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, पारोळा) व रामचंद्र पाटील (तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, पाचोरा) यांनी रस्त्यावर उतरून ट्रकचा पाठलाग केला. अखेर ट्रक ताब्यात घेऊन त्यातील संपूर्ण युरिया खतासह वाहन भडगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.

या प्रकरणी खत (नियंत्रण) आदेश, १९८५ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत युरिया खताची अवैध वाहतूक व काळ्या बाजारातील विक्रीप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री १२ ते १२.३० वाजेदरम्यान सुरू होती. दरम्यान, शेतकऱ्यांचा हक्काचा युरिया काळ्या बाजारात वळविणाऱ्यांवर कृषी विभागाची करडी नजर असून, अशा घटकांविरुद्ध यापुढेही कडक व निर्भीड कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या