जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मंगळवार दि.१२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगावात भजे गल्ली परिसरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोपडा मार्केट येथील एका लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखानावर जिल्हापेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाई दरम्यान एकूण ५ महिलांसह ४ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ माजली असून. ही कारवाई मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
सविस्तर माहिती अशी की, भाजे गल्ली येथील चोपडा मार्केट येथे एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अधिक तपास करीत छापा टाकण्यासाठी पथक तयार केले.पथकातील कर्मचाऱ्यांना सूचना देत त्यांना चोपडा मार्केट येथे रवाना केले. यावेळी पोलिसांकडून बनावट ग्राहक बनवून पंटरद्वारे आत प्रवेश केला असता, त्या कुंटणखान्या ठिकाणी ५ महिला व काही पुरुष असल्याचे त्यांना आढळून आले. तेथून पथकाला माहिती प्राप्त होताच पोलिसांनी दि.१२ सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास तेथे छापा टाकून एकूण ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. त्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ही कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांनी सहकार्य केले