Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रभाटेवाडी येथे चारचाकी वाहन मागे घेऊन पार्किंग करताना कारसह विहिरीत पडून एका...

भाटेवाडी येथे चारचाकी वाहन मागे घेऊन पार्किंग करताना कारसह विहिरीत पडून एका शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू

सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- उत्तर सोलापूर तालुक्यातील भाटेवाडी येथे चारचाकी वाहन रिव्हस गिअर मध्ये टाकून पार्किंग करताना विहिरीत पडून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विरेश बसवराज झुझगार (वय वर्षे 40),राहणार मल्लिकार्जुन नगर, सोलापूर असे मयत शिक्षकाचे नाव आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वडगाव येथे कार्यरत असलेले झुझगार यांनी कांही दिवसापूर्वीच नवीन चारचाकी वाहन त्याचा क्रमांक एमएच 13 ईसी 6068 विकत घेतली होती.आज रविवार असल्याने सदरची गाडी घेऊन आपल्या कुटुंबा सोबत त्यांची सासुरवाडी भाटेवाडी,ता.उत्तर सोलापूर येथे गेले होते.तेथे पोहोचताच कुटुंबाला चारचाकी वाहनातून उतरवून ते गाडी रिव्हस घेत असतानाच जवळच असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये गाडी पडली आणि विहिरीतील पाण्यात बुडून त्या शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला.मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आले आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व त्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती..त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या