नागपूर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- भ्रातृ मंडळ नागपूर येथे दिवाळी मिलन हा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. लक्ष्मी पूजन आणि गणपतीची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. छान प्रकारे मनोरंजनाचे खेळांचे आयोजन करण्यात आले .
आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आलीत. डॉ. प्रणिता नारखेडे यांनी कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी व सुनियोजन केले व त्यांना सौ. दीपाली राणे, डॉ माधुरी पाटील व आशा चौधरी यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली. त्यानंतर सर्वांनी मनसोक्त सह भोजनाचा आस्वाद घेतला. समाज बांधव या निमित्ताने एकत्र आले होते.