Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावभ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेतर्फे रोजंदारी कंत्राटी मजुरांच्या हितार्थ आमरण अन्नत्याग उपोषण

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेतर्फे रोजंदारी कंत्राटी मजुरांच्या हितार्थ आमरण अन्नत्याग उपोषण

चोपडा/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चोपडा येथील नगरपरिषद कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी भारतीय सविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ नागरिक भाऊसाहेब कांबळे हे नगरपरिषद प्रशासन संचालनालाय बेलापूर नवी मुंबई येथे रोजंदारी कञाटी शोषित दलित बहुजन समाजातील मजुराच्या हितार्थ आमरण अन्नत्याग उपोषणास बसणार आहेत. त्याच अनुषंगाने चोपडा नगरपरिषद चोपडा येथे सकाळी साडेअकरा वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत उपोषणास काळी फित लावून निषेध व्यक्त केला.

 

भ्रष्टचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र संघटनेतर्फे घोषणाबाजी करत, रोजंदारी कञाटी मजुरांना न्याय मिळालाच पाहिजे, संघटनेचा एकच नारा रोजंदारी कंञाटी शोषित दलित मजुरांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्यातील 387 नगरपरिषद नगरपंचायत अ.ब.क वर्गामध्ये शोषित दलित रोजदारी कंञाटी मजुरांच्या खात्यात शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार पैसे जमा करावेत व त्यांचा ईपीएफ कार्यालयामध्ये जमा करून घेण्यात यावा. तसेच मजुरांचे शोषण करून आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकार यांचेकडून पैसे वसूल करण्यात यावे आणि मजुरांच्या खात्यात जमा करण्यात यावे. तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकरच्या मागण्या करण्यात आल्या उपोषण स्थळी सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते.

 

उपोषण स्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात आला होता.यावेळी उपोषणात सहभागी जळगाव जिल्हा महासचिव हेमकांत गायकवाड, तालुका अध्यक्ष सुनील पावरा, तालुका उपाध्यक्ष डाॕ.रवींद्र कोळी, शहर सचिव विकी पारधी, शहर कार्याध्यक्ष राहुल बाविस्कर, तालुका संघटक दिनेश पाटील उपस्थित होते. तसेच तालुका सदस्य समाधान बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते संदिप बाविस्कर यांनी उपोषणास पाठिंबा दिला.उपोषण सोडविण्यासाठी मानव विकास पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विनायक पाटील यांनी पुढाकार घेऊन उपोषण कर्त्यांना सरबत पाजुन उपोषण सोडविले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या