Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeभुसावळबारावीचा इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या.

बारावीचा इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या.

भुसावळ / प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह :- समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने इंग्रजी पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २७ फेब्रुवारी दुपारी उघडकीला आले आहे. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. इदांत पंकज मंडेलेचा वय १७ रा. समृध्दी पार्क, भुसावळ असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील समृध्दी पार्क येथे इदांत पंकज मंडेलेचा हा मुलगा आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला होता. तो यावर्षी बारावीच्या वर्गात शिक्षण करीत होता. काही दिवसांपासून बारावीचे परीक्षा सुरू आहेत. यामध्ये इदांत मंडलेचा याने देखील परिक्षा देण्याची तयारी केली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. परंतू हा पेपर त्याला अवघड गेल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होता. दरम्यान त्याने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात कोणीही नसताना छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.

या घटनेबाबत रात्री भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश चौधरी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या