Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळ: दीपनगर वीज केंद्रातील अधीक्षक अभियंत्याला लाच प्रकरणात एसीबीकडून अटक

भुसावळ: दीपनगर वीज केंद्रातील अधीक्षक अभियंत्याला लाच प्रकरणात एसीबीकडून अटक

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) अंतर्गत येणाऱ्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील एका वर्ग-१ अधिकाऱ्याला लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. २ लाख २८ हजार ५४४ रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडे ५ टक्के दराने लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ५ हजार रुपये घेण्यास आरोपी अधिकारी तयार झाल्याने ही कारवाई करण्यात आली.भानुदास पुंडलिक लाडवंजारी (वय ५७), रा. नेहरू नगर, जळगाव असे गुन्हा नोंदविण्यात आलेल्या अधीक्षक अभियंत्याचे नाव आहे. ते दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

तक्रारदार हे २१० मेगावॅट पॉवर प्लांटच्या कामाशी संबंधित एका कंपनीत साईट सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कंपनीने २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्लांटच्या तळाशी जमा होणारी राख उचलणे, मोडतोड, तेलाचे बरेल काढणे आणि वाहतूक यासंबंधीचे काम केले होते. या कामाचे बिल मंजुरीसाठी मुख्य अभियंता, बी.टी.पी.एस विभाग, दीपनगर यांच्याकडे पाठवण्यात आले होते.हे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी लाडवंजारी यांनी तक्रारदाराकडे ५ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्यानंतर तडजोडीतून ५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी आरोपींनी दर्शवली.२९ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली. पंचासमक्ष पडताळणी दरम्यान आरोपी अधीक्षक अभियंता यांनी ५ हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या