Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeभुसावळभुसावळ ..संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या डबल मर्डर प्रकरणातील प्रमुख आरोपीचा...

भुसावळ ..संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या डबल मर्डर प्रकरणातील प्रमुख आरोपीचा मृत्यू !

भुसावळ/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ येथील डबल मर्डर केस मधील संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या दुहेरी खून प्रकरणातील प्रमुख आरोपी नितीन पथरोड याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

दि.२९ मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान भुसावळ शहरातील जुना सातारा रोडवरून कारमधून भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे येत असताना राजेश सूर्यवंशी व बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या जुन्या वादातून काही हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांकडून जलद तपास चक्र फिरवीत या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर मारेकरी फरार झाले आहेत.

नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार, या प्रकरणातील प्रमुख आरोपींना सुरक्षतेच्या कारणास्तव नंदुरबार येथील कारागृहात हलविण्यात आले आहे. यातील आरोपी नितीन पथरोड याची प्रकृती काही दिवसांपूव बिघडल्याने त्याच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. रूग्णालयात उपचार सुरू असतांनाच काल रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला नंदुरबार पोलिसांच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या