Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeभुसावळफरार आरोपी जळगाव गुन्हे शाखेकडून गजाआड 

फरार आरोपी जळगाव गुन्हे शाखेकडून गजाआड 

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दि. ०७ मे २०२५ रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी आशिक वेग असलम वेग उर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आरोपीचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शरद बागल, श्रे. पोउपनि रवी नरवाडे व त्यांच्या पथकाने आरोपीच्या शोध मोहीमेची सुरुवात केली.

दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फरार आरोपी आशिक बेग उर्फ बाबा काल्या हा फैजपूर येथील हॉटेल हॉटस्पॉट येथे आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने फैजपूर पोलिसांच्या मदतीने हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पुढील तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोउपनि शरद बागल, श्रे. पोउपनि रवी नरवाडे, पोहे.का. गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, पोकॉ. विकास सातदिवे, पोकॉ. प्रशांत परदेशी, पोको. राहुल वानखेडे (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच फैजपूर पोलीस स्टेशनचे सपोनि रामेश्वर मोताळे, पोउपनि मैनुद्दीन सैप्यद व पोकी. जुबेर शेख यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या