भुसावळ | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- दि.15 जून रोजी सायंकाळी 6 वा. ते 16 जून रोजी सकाळी 08.40 वा. दरम्यान फिर्यादी नंदलाल मिलकीराम मकडीया, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ यांच्या गायत्री नगरमधील राजस्थान मार्बल शेजारी असलेल्या पत्र्याच्या गोडावूनचे शटर उचकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. गोडावूनमधून फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही अशा सुमारे ₹35,00,000/- किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीस गेल्याची नोंद आहे.
सदर प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक 17 जून रोजी सीसीटीएनएस गु.र.नं. 295/2025, भा.दं.वि. कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासदरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, स्था. गु. शाखा जळगाव व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनी समांतर तपास केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे, चोरीस गेलेला मुद्देमाल शिरपूर शहरातील करवंद रोडवरील महावीर लॉन्सजवळील एका खाजगी पत्र्याच्या गोडावूनमध्ये ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस पथकाने त्या ठिकाणी जाऊन पंचासमक्ष पंचनामा करून एकूण ₹18,80,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गोडावूनचे मालक मुजावर जामील शेख चांद, वय 48, रा. न्यु बोराडी, शिरपूर, जफर शेख मुजावर, वय 24, रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कृष्णात पिंगळे, स्था. गु. शाखा निरीक्षक श्री. संदीप पाटील आणि बाजारपेठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये पोहेकॉ उमाकांत पाटील, विजय नेरकर, संदीप धनगर, सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, जावेद शहा (बाजारपेठ पो. स्टे), पोउनि. शेखर डोगाळे, फौजदार रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, मुरलीधर धरगर, संदीप चव्हाण, प्रविण भालेराव, चालक भरत पाटील (स्थागुशा), पोहेकॉ गहेश चौधरी, पोशि राहुल भोई (भुसावळ तालुका पो.स्टे) हे सहभागी होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. राहुल टी. वाघ हे करीत आहेत.