Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeभुसावळमोफत आरोग्य शिबिरात 247 नागरिकांना आयुर्वेदातून लाभ ; बालकांपासून वृद्धांपर्यंत नवसंजीवनीचा अनुभव

मोफत आरोग्य शिबिरात 247 नागरिकांना आयुर्वेदातून लाभ ; बालकांपासून वृद्धांपर्यंत नवसंजीवनीचा अनुभव

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कुऱ्हे (पानाचे) येथे गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि स्वराज्य जननी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण, सदस्य बापू आठवले तसेच कार्यकारिणी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कळसकर सर, उपाध्यक्ष रवींद्र गांधीले, जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, सरपंच सौ. दुर्गाताई शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते. संधिवात, आमवात, मधुमेह, हृदयविकार, आम्लपित्त, स्थूलपणा आणि त्वचेचे विकार अशा विविध आजारांवर आयुर्वेद पद्धतीने तपासणी व उपचार करण्यात आले. एकूण 247 रुग्णांनी मोफत सेवा घेतली, यामध्ये 20 लहान मुलांचा समावेश होता. वृद्धांना मानसिक आधार मिळाल्याने आणि आरोग्याबाबत नवचैतन्य निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या शिबिरात डॉ. साजिया खान, डॉ. पालवे चौधरी, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. शबिना गवळी, मोहित येवले, गौरव चौधरी आदी तज्ञ डॉक्टरांनी सेवा बजावली. आयुर्वेदिक उपचारांचे महत्व आणि प्रभावी परिणाम अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्व वयोगटांसाठी लाभदायी ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या