Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

भुसावळात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

भुसावळ/पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या रुपेश मंगल पाटील याने गावातच राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला २०१९ ते आतापर्यंत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तुला माझ्यासोबत राहावे लागेल.तू जर माझ्यासोबत नाही आलीस तर तुझ्या घरच्या लोकांना पाहून घेईल व त्यांना मी त्रास देईल अशी धमकी त्याने अल्पवयीन तरुणीला दिली. त्यामुळे तिने घाबरून जाऊन हा घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला नाही. काही दिवस लोटल्यानंतर तिला हा त्रास असह्य झाल्याने तिने २ ऑगस्ट रोजी आपल्यावर झालेली आपबीती घरच्यांना सांगितली. दि. २० सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी तिने आपल्या नातेवाईकंना सोबत घेऊन भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारअंती संशयित आरोपी रुपेश मंगल पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णा पिंगळे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या