Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळात पहाटे कोंबिंग ऑपरेशन : हिस्ट्रीशीटर, हद्दपार व फरार आरोपींवर धडक कारवाई..

भुसावळात पहाटे कोंबिंग ऑपरेशन : हिस्ट्रीशीटर, हद्दपार व फरार आरोपींवर धडक कारवाई..

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव भुसावळ शहर व बाजारपेठ परिसरात मंगळवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ शहर आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबविले. हे ऑपरेशन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. पहाटे ३ ते ७ या वेळेत अचानक छापे टाकून हिस्ट्रीशीटर, हद्दपार आणि फरार आरोपींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

ऑपरेशनदरम्यान हद्दपार आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत २, तर कलम १२२ अंतर्गत २ कारवाया करण्यात आल्या. शस्त्रास्त्र अधिनियम 4/25 अंतर्गत १ गुन्हा नोंदविण्यात आला. याशिवाय NBW ९, BW १०, तसेच ७२ समन्स बजावण्यात आले. हिस्ट्रीशीटर ५६, हद्दपार आरोपी ९ आणि रेकॉर्डवरील ९० आरोपींची पडताळणी करण्यात आली.कोंबिंगदरम्यान भुसावळ रेल्वे पोलिसांना हवा असलेला सादिक अली नियाज अली हा फरार आरोपी सापडला. मोबाईल चोरीचे २ गुन्हे उघडकीस येत त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच एमआयडीसी पो. स्टे. मधील पाहिजे असलेली आरोपी मरियम हिचा शोध लागून तिला संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ शहर आणि भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. येथील ६ अधिकारी व ७५ अंमलदार, तसेच पोलीस मुख्यालयातील आरसीपी पथक सहभागी झाले.पोलिसांनी शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या