Tuesday, January 28, 2025
police dakshta logo
Homeभुसावळभुसावळात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे 3 घरे कोसळली ; लाखोंचे नुकसान ; जीवितहानी टळली

भुसावळात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे 3 घरे कोसळली ; लाखोंचे नुकसान ; जीवितहानी टळली

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ शहरातील यावल रस्त्यावरील साईचंद्र नगरात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे दुमजली तीन घरे कोसळल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सकाळीच रहिवाशांनी तीनही घरे खाली केल्याने जीवीतहानी टळली तर या घटनेत घर व त्यातील साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले. अवघ्या काही वर्षांपूर्वीच घेतलेली घरे कोसळल्याने रहिवाशांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

प्रशासनाची घटनास्थळी तातडीने धाव
साईचंद्र नगरात तीन घरे कोसळल्याचे वृत्त कळताच पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके व परवेज शेख, अभियंता रितेश बच्छाव, अभियंता शुभम विसपुते तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसह रेस्क्यू टीमने धाव घेत पाहणी केली. शहर पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, सहा.निरीक्षक निलेश गायकवाड, हवालदार फिरोज तडवी, हवालदार दीपक कापडणे, कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींनी धाव घेतली.

रिटेनिंग वॉल तुटल्याने नुकसान : विकासक चंद्रशेखर अत्तरदे

विकासक चंद्रशेखर अत्तरदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालिकेने उभारलेली रिटेनिंग वॉल सततच्या पावसामुळे कोसळल्याने तीन्ही घरे कोसळली आहे. संततच्या पावसानंतर पावसाचा निचरा होवू न शकल्याने दुर्घटना घडली. सुमारे 15 वर्षांपूर्वीच आपण ले आऊट विक्री केला आहे. ज्या विकासकांनी घरे बांधली त्यांच्यासाठी पालिकेने संरक्षक भिंत बांधून दिली मात्र पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे भिंत कोसळल्याने घरेदेखील कोसळली, असेही अत्तरदे म्हणाले.परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या