Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावभुसावळात मातृभूमी मंडळातर्फे दसऱ्याला रावण दहनाचा कार्यक्रम

भुसावळात मातृभूमी मंडळातर्फे दसऱ्याला रावण दहनाचा कार्यक्रम

भुसावळ /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर सालाबादाप्रमाणे मातृभूमी मंडळातर्फे दसऱ्याला रावण दहनाचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यंदाच्या उत्सवात गेवराई येथील कलाकारांकडून रंगबेरंगी फटाक्यांची आतषबाजी होईल.

आमदारांच्या हस्ते रावण दहन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते रावण, उद्योगपती मनोज बियाणी यांच्याहस्ते कुंभकर्ण तर किरण महाजन यांच्याहस्ते मेघनाथच्या प्रतिमेचे दहन होईल. खासदार रक्षा खडसे, प्रांत जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, तहसीलदार नीता लबडे, शहर पोलीस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठचे निरीक्षक बबन आव्हाड, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन जगताप आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे ,असे आयोजकांच्यावतीने कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या