जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- भुसावळ शहरातील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली असून, याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,भुसावळ शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून भुसावळ शहरात इम्तीयाज मोहम्मद युनूस बागवान (वय ४०) हे पटेल कॉलनीत परिवारासह वास्तव्यास असून, व्यापाराचे काम करतात व यावरच आपला उदरनिर्वाह करीत असतात. दि.७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते कामानिमित्त बाहेर गेले होते.या दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरातून ५ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दानिगे चोरून नेले. इम्तीयाज बागवान हे आपले काम आटोपून रात्रीच्या वेळी ८.३० वाजता पोहचले. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.
याप्रकरणी दि. ८ जानेवारी सोमवार रोजी दुपारी दीड वाजता इम्तीयाज बागवान यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर भोये हे करीत आहे.