Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमखुनाची मालिका सुरूच...! पूर्व वैमनस्यातून भुसावळच्या खडका रोड परिसरात धारदार शस्त्राने तरुणाचा...

खुनाची मालिका सुरूच…! पूर्व वैमनस्यातून भुसावळच्या खडका रोड परिसरात धारदार शस्त्राने तरुणाचा खून..!

भुसावळ/ पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- भुसावळ शहर क्राईमचे शहर म्हणून आधीच प्रचिलीत आहे. या शहरात गुन्हेगारी खूप वाढली आहे.निखील राजपूत याच्या खुनानंतर काही दिवसांचा अवधी उलटत नाही तोच भुसावळात आज पुन्हा खून झाल्याने परिसर हादरला आहे. खुना मागे खून घडत असून पोलीस खात्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर काही दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा एकदा शहरात खून झाला आहे.

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात पूर्व वैमनस्यातून नाजीर शेख नशीर ( वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाले. तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या