Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळात तलवारीने दहशत माजवणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई

भुसावळात तलवारीने दहशत माजवणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरातील गोकुळ टी परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले. कारवाईदरम्यान पोलिसांनी एक लोखंडी तलवार जप्त केली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ टी परिसरात केवल अनिल टाक (वय ३०) व शिवा जगदीश पथरोड (वय ३०, दोघे रा. भुसावळ) हे अवैधपणे लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. माहिती मिळताच निरीक्षक वाघ यांनी तात्काळ पथकाला घटनास्थळी रवाना केले.

पोलिसांनी वेळीच कारवाई करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या