भुसावळ/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- भुसावळ येथे गणेश विसर्जनासाठी आलेल्या व उभ्या असलेल्या ओमनी मॉडेलच्या कारने कार चालकाने सेल मारताच अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
भुसावळ येथे काल गणपती विसर्जनाच्या वेळी तापी नदीच्या पात्रात विसर्जन सुरू होते. या विसर्जनासाठी आलेले गोपाळ भंगाळे (जुना सातारा) भुसावळ हे आपल्या कुटुंबासह भगवान परशुराम मंदिराच्या बाजूने गणेश विसर्जनासाठी असल्या ओमनी कारमधून आले व त्यांनी आपली गाडी पार्किंग करून नदीपात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. यानंतर ते परत जायला निघाले असता गाडीत बसले. त्यांनी आपल्या गॅसवर चालणाऱ्या ओमनी गाडीला सेल दिला. गाडीला सेल देताच या गाडीतील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा प्रकार घडताच परिसरात एकच धावपळ उडाली. तेथील लोकांनी धाव घेत आग विझवली. या दरम्यान घटनेत गोपाळ भंगाळे यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अपघात घडला तेव्हा या गाडीत कोणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे. गाडीच्या सर्व काचा बंद असल्याने गॅस लीक झाल्यावर तो बाहेर पडू शकला नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.