Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगाववडापाव-समोसा घेण्यावरून झाला वाद; भुसावळात तरुणाला लोखंडी सराट्याने मारहाण..!

वडापाव-समोसा घेण्यावरून झाला वाद; भुसावळात तरुणाला लोखंडी सराट्याने मारहाण..!

भुसावळ/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- भुसावळ शहरातील गुन्हेगारी ही वाढतच चालली आहे.पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.अकबर टॉकीजजवळ वडाभाव व समोसे घेण्यावरून वाद होवून वडापाव दुकानावरील काम करणाऱ्या एकाने लोखंडी सराटा तरूणाच्या डोक्यावर मारहाण दुखापत केल्याची घटना घडली होती. उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, तिलक देविदास मट्टु (वय-२७) रा. आंबेडकर नगर, रेल्वे हॉस्पिटलजवळ, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिलक हा वडापाव आणि समोसे घेण्यासाठी शहरातील अकबर टॉकीजजवळील वडापाव विक्री करणाऱ्या दुकानावर गेला. त्यावेळी वडापाव आणि समोसा घेण्यावरून दुकानावरील राहून नावाच्या तरूणाशी शब्दिक वाद झाला. त्यानंतर राहूलने शिवीगाळ करून दुकानात असलेला लोखंडी सराटा तिलकच्या डोक्यात टाकला. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होवून अधिक रक्तस्त्राव झाला होता. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते.२० दिवसांच्या उपचारानंतर तिलक याने भुसावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहूल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जाकीर मसुरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या