Saturday, March 28, 2026
police dakshta logo
Homeजळगावभुसावळातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात !

भुसावळातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात !

भुसावळ /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– भुसावळ शहरात एकाच रात्री दोन खून झाल्याने जिल्हा हादरला होता, त्यानंतर त्यातील पहाटेच्या सुमारास एका कुविख्यात गुन्हेगाराचीही हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत सकाळी १० वाजेच्या सुमारास मयताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या खुनातील आरोपीला बाजारपेठ पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून पुढील चौकशी सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वांजोळा रोड परिसरातील दत्तनगरातील रहिवासी सुरेश पांडू शिंदे, (वय-६८) यांनी आज पहाटे बाजार पेठ पोलीसात फिर्याद दिल्यानुसार दि.२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निवृतीनगर येथील काशी विश्वेवर मंदिरासमोरील नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या सिमेंटच्या टाकीच्या टेरेसवर त्यांचा मुलगा निखील सुरेश राजपूत, वय २९ वर्षे हा झोपण्यास गेलेला होता. यातील संशयित आरोपी निलेश चंद्रकांत ठाकूर, (वय २२) हा मयताची पत्नीचा भाऊ आहे. यातील मयत याने दुस-या बाईसोबत प्रेमसंबध ठेवल्याने मयत हा त्याची पत्नीशी नेहमी भांडण करीत होता. त्याचा मनात राग ठेवून आरोपीताने चाकू सारख्या धारदार शस्त्राने मयताचे गळ्यावर, छातीवर वार करुन गंभीर दुखापत करून ठार केले.त्यावरुन बाजारपेठ पोलीस स्टेशनला मयताचे वडीलांनी आरोपीच्या विरुध्द फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.या गुन्हयाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांनी केला. काही तासातच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विजय नेरकर, रमण सुरळकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, यासीन सत्तार पिंजारी, महेश चौधरी, योगश माळी, सचिन चौधरी,जावेद शहा, प्रशांत सोनार, योगेश महाजन, दिनेश कापडणे, अमर आढाळे यांच्या मदतीने आरोपीला लागलीच ताब्यात घेवून अटक केली आहे. यातील मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या