Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमविनापरवाना गुरे वाहतूक करणाऱ्यांवर तालुका पोलिसांची कारवाई; एका वासराचा मृत्यू

विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱ्यांवर तालुका पोलिसांची कारवाई; एका वासराचा मृत्यू

जळगाव |प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील भोकर येथे विनापरवाना व क्रूरपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर तालुका पोलिसांनी कारवाई करत पाच गायी व सहा वासरांची सुटका केली. मात्र, यात एक अडीच वर्षीय वासरू मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ट्रक चालक आणि गुरे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (क्र. GJ 03 BW 8756) मधून गुरांची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले. तपासणीदरम्यान, ट्रकमध्ये गुरांना अतिशय अमानुष पद्धतीने दाटीवाटीने कोंबून ठेवण्यात आले होते. यामध्ये पाच गायी आणि सहा वासरे होते. यातील एका अडीच वर्षांच्या वासराचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी यांनी फिर्याद दिली असून, ट्रकचालक रामजी रणछोड धोंडा (वय २३, रा. हाडाखेड, जि. धुळे) व गुरे मालक तेजस शरद म्हस्के (वय २६, रा. वाघनगर) यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील करीत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा जनावरांच्या अवैध वाहतुकीबाबत गंभीरता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या