Tuesday, September 17, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभाजप, ठाकरेंना दणका बसणार; आताच निवडणुका लागल्या तर, राज्यात मोठा उलटफेर होणार..?

भाजप, ठाकरेंना दणका बसणार; आताच निवडणुका लागल्या तर, राज्यात मोठा उलटफेर होणार..?

महाराष्ट्रात लोकपोल या संस्थेने केलेल्या सर्व्हेचा निष्कर्ष..!

मुख्य संपादक चंदन पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह :-लोकसभेच्या निडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर अशातच महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर समीकरण कसे असेल, बहुमत कोणाला मिळेल, सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील की महायुतीला, शिंदे सेनेची जादू चालेल की उद्धव ठाकरे सेनेची, दोन्ही राष्ट्रवादी पैकी अजित पवार सरस ठरतील की शरद पवार, भाजप आघाडी घेईल की काँग्रेस किंवा मनसे निर्णायक ठरणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे निवडणूक पूर्व घेतलेल्या सर्व्हेमध्ये समोर आली आहेत.

आता महाराष्ट्रात विधानसभेच्या वातावरणाला सुरुवात झाली आहे. तशी वातावरण निर्मितीही झाली आहे. लाडकी बहीण योजना आणून शिंदे सरकारने लोकसभेला मतांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि तो बऱ्यापैकी यशस्वी ही झाला आहे. तर विरोधकांनी या योजने विरोधात प्रचार तर केलाच परंतु त्यांनी ते दीड हजार देतायत पण आपले सरकार आले की आम्ही दोन हजार देऊ असाही प्रचार विरोधकांकडून होतांना दिसत आहे. अशातच महाराष्ट्राचा विधानसभा निवडणूक पूर्व पहिला सर्व्हे हाती आला आहे.

विदर्भ, कोकण, महाराष्ट्रात कोण किती जागा मिळवणार. पवार की शिंदे?

आज निवडणुका लागल्या तर महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे काय होईल, या विजयी समीकरणात महाविकास आघाडी,महायुती, शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार,शरद पवार यांचा चांगलाच कस लागणार असून, या विधानसभा निवडणुकीत भाजप आपली सत्ता कायम ठेवेल की काँग्रेस मुसंडी मारेल.अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये शोधण्यात आली आहेत. लोकपोल या संस्थेने केलेल्या सर्व्हेत २८८ मतदारसंघाताली सुमारे दीड लाख लोकांचे मत यासाठी विचारात घेण्यात आली आहेत.

विधानसभा निवडणूक राज्यात नोव्हेंबरमध्ये लागणार आहे. राज्यात महायुती आणि मविआ अशी थेट लढत होणार आहे. तर मराठा आंदोलक यांना हाताशी घेऊन प्रकाश आंबेडकर व संभाजी राजे छत्रपती, अशी तिसरी आघाडीची तयार होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.अजित पवारही त्या प्रवाहात असू शकतात. मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. पण या संभावित समीकरणा नुसार पाहिले तर मविआ विरुद्ध महायुती अशी थेट लढत पहावयास मिळेल. आणि या नुसार २८८ जागांपैकी महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याची दाट अशी शक्यता आहे. तर मविआला १४१ ते १५४ जागा मिळताना दिसत आहेत. तर इतरांना ५ ते ८ जागा मिळताना दिसत आहेत. भाजपसाठी धक्कादायक बाब म्हणजे ३८ ते ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला ४१-४४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. यामुळे लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा मविआला ३-४ टक्क्यांचा आधार मिळणार आहे.

शिंदेंची लोकप्रियता कमालीची वाढली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची झाली कमी..!

लोकपोल या संस्थेने केलेल्या या सर्वेच्या आधारे राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लोकप्रियता कमालीची वाढली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कमी झाली आहे.काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. परंतू या पक्षाला ताकदीने प्रचार करावा लागणार आहे. महायुतीसाठी मात्र ही धक्कादायक बाब असून….महायुतीसाठी पर्यायाने ही मते शिंदे-फडणवीसांची सत्ता घालविणारी ठरणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या