Saturday, July 12, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedबोदवड-जामनेर रस्त्यावर अपघात; एक जण ठार तर पाच जखमी

बोदवड-जामनेर रस्त्यावर अपघात; एक जण ठार तर पाच जखमी

जामनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अपघाताची मालिका सुरूच असून जिल्ह्यात आज दोन अपघात झाले आहेत.जामनेर शहराजवळील भवानी घाटात चारचाकी आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघातात शिरसाळा मारूती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी बोदवडकडून ४ चाकी वाहन जामनेरकडे येत होते तर पाचोरा तालुक्यातील पुंनगाव येथील तिघेजण शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जात असताना रामवन मंदिरा समोर रस्त्यावर दोघे वाहन समोरासमोर अपघात झाला. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुनगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन नाल्यात जावून पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर, वंदना माधव दांभोरे, प्राजक्ता विठ्ठल आसुदे रा. छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या