Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज: माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक

ब्रेकिंग न्यूज: माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यात महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोर धरू लागले आहेत. निवडणूक यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली असून उमेदवारांची धावपळ सुरू असतानाच नंदूरबारमधील एका घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.नंदूरबार शहरात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना शहर पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चौधरी यांच्याविरोधात दरोडा तसेच अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून, त्याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

नगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या सत्तास्थापन प्रक्रियेत माजी आमदार चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांना उपनगराध्यक्ष पद मिळाले होते. या निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद पुढे हिंसक वळणावर गेला असून, त्याच रात्री माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी तोडफोड झाल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर नंदूरबार शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक केली. मात्र, अटकेनंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, माजी आमदार चौधरी यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे नंदूरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील तपासात पोलिस कोणती दिशा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या