पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पुण्यात हिंजवडी येथील रहिवासी पिंपरी इथे बँकेतून एका मोठ्या पोस्टवरून निवृत्त झालेले असून या अधिकाऱ्याला फोरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवत अवघ्या दोन महिन्यात या अधिकाऱ्याची तब्बल 92 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. .
मिळालेल्या माहितीनुसार, मदन कोरे (वय 62 ) असे या अधिकाऱ्याचे नाव असून चार बँक खातेदार ईशांत चोप्रा, विराज गायकवाड आणि इतर दोघांन विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार व्यक्ती यांची ओळख आरोपींसोबत ट्रेडिंग करताना झालेली होती. त्यावेळी आरोपींनी तक्रारदार व्यक्ती यांना आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढले. आरोपी व्यक्तींनी त्यानंतर त्यांच्या कंपनीच्या ठिकाणी तक्रारदार व्यक्ती यांचे अकाउंट आणि आयडी तयार केले त्यानंतर शेअर मार्केट त्यानंतर फोरेक्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बँक खात्यावर वेळोवेळी पैसे घेतले. जेव्हा जेव्हा तक्रारदार यांनी आरोपींकडून नफ्याची मागणी केली त्यावेळी त्यांना अकाऊंटला कर भरण्यास सांगितले. ब्रिटिश सरकारच्या नियमाप्रमाणे अधिक कर भरल्यानंतर नफा दिला जाईल असे सांगत आरोपींनी आपली अडवणूक केली. या संदर्भात तक्रारदार व्यक्ती यांनी आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.