Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांदवड उपजिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभार; प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी केली पोलखोल

चांदवड उपजिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभार; प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी केली पोलखोल

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाल्याने एका बालिकेला उपचारासाठी दाखल केले होते. या रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी त्या बालिकेला मृत्यू झाला होता.याबाबत प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते.त्याचा पाठपुरावा करण्यासाठी व या प्रकरणाची विचारपूस करण्यासाठी गणेश निंबाळकर हे उपजिल्हा रुग्णालयात आले असता भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

येथील डॉ विकास गांगुर्डे हे आज रोजी उद्याची सही करून गेल्याचे हजेरी मस्टर ला दिसून आले.सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे दिसून आले.आज वैद्यकीय अधीक्षक आव्हाड हे रजेवर असून त्यांनी ज्या रमाकांत सोनवणे यांचेकडे चार्ज सोपविला आहे ते 4 दिवसांपासून रुग्णालयात आलेलेच नाही. यावरून रुग्णालयाचा भोंगळ कारभार स्पष्ट दिसून येतो. यापूर्वीही 6 ते 7 दिवसांपूर्वी याच रुग्णालयातील एक डॉक्टर खाजगी कॉल साठी गेल्याचे सुद्धा उघडकीस आले होते. मात्र अधीक्षक साहेबांनी सदर प्रकार दडपून नेल्याची चर्चा सुरू आहे. यावरून प्रकरण उघडकीस आल्यावर फक्त मलमपट्टी करण्यात आल्याचे दिसते, अश्या प्रकारच्या भोंगळ कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे असे निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी बच्चू कडू यांच्या कानावर सर्व विषय टाकून लक्षवेधी मांडायला लावणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या