चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या धक्कादायक घटनेनंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सोमा उर्फ सागर चौधरी, हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी या तिघांना अटक केली.
आरोपींची पायी धिंड
रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पोलिसांनी या तिन्ही आरोपींची शहरातून पायी धिंड काढली. भरदिवसा माजी नगरसेवकावर हल्ला करून शहरात दहशत माजवणाऱ्या आरोपींना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला. धिंडीदरम्यान शहरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
न्यायालयीन कोठडी
धिंड काढल्यानंतर आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या दरम्यान हल्ल्यामागील कारणे, इतरांचा सहभाग व वापरलेली शस्त्रे याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.