Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeअपघातविद्युत शॉक लागल्याने चाळीसगाव तालुक्यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

विद्युत शॉक लागल्याने चाळीसगाव तालुक्यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात दोन ठिकाणी विद्युत शॉक लागून एकाचा मृत्यू ओढवला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.. घराच्या दरवाजात विद्युतप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हातले तांडा येथे घडला .याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धनश्री साईनाथ राठोड (वय १७ वर्ष रा. हातले तांडा ता. चाळीसगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने राठोड परिवारात दुःखाचा डोंग कोसळला आहे.. सध्या पाऊस सुरू असल्या कारणाने अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत.

धनश्री राठोड हिचे वडील साईनाथ काशिनाथ राठोड हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी ( २५ जून ) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तिच्या परिवारातील सदस्य कामावर गेले होते. तसेच धनश्रीचा भाऊ हा बाहेर गेला असता धनश्रीही दरवाजाची कडी लावायला गेली. तेव्हा अचानक दरवाज्यात विद्युत प्रवाह आल्याने धनश्रीला विजेचा धक्का बसला आणि ती बाजूला फेकली गेली.

दरम्यान, मीटरची वायर कट झाल्यामुळे हा विद्युत प्रवाह उतरला होता अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. दरम्यान, धनश्रीला कुटुंबीयांनी तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. तिच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ असा परिवार आहे. हातमजुरी करणाऱ्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद घटनेमुळे हातले तांडा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या