Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमचाळीसगाव बांधकाम विभागातील लाच प्रकरण; लाचखोर अभियंत्याला कोठडी..

चाळीसगाव बांधकाम विभागातील लाच प्रकरण; लाचखोर अभियंत्याला कोठडी..

चार कोटी 82 लाखांचे क्लस्टर कामाचे बिल काढण्यासाठी स्वीकारली होती चार लाखांची लाच

चाळीसगाव/पोलीस दक्षता लाईव्ह:- चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) यांना क्लस्टर कामाचे चार कोटी 82 लाखांचे बिल काढून देण्यासाठी तडजोड झाल्यानंतर चार लाखांची लाच घेताना विसपुते यांना नाशिकमधील गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी नाशिक एसीबीने अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर बुधवार रोजी कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील तक्रारदार याने डॉ.शामा प्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता. चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव , अंतर्गत पातोंडा, ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसीत करण्याचे काम घेतले होते. या कामाचे मूल्य एकूण चार कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात तसेच कामाच्या अतिरीक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात आरोपी विसपुते यांनी तक्रारदार यांच्याकडून पाच लाखांची मागणी केली होती. नंतर ह्या रकमेत तडजोड करीत चार लाख देण्याचे ठरले. तक्रारदार यास विसपुते यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे या बाबतची तक्रार नोंदवली. नाशिकमध्ये तक्रारदार आल्यानंतर विसपुते यांना सार्वजनिक रस्ता गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी लाच स्वीकारताच अटक करण्यात आली होती. विसपुते यांना अटक केल्यानंतर कारवाईत एसीबीने धुळे येथील अशोक नगरातील घरात झडती घेतली असता तब्बल 27 तोळे सोने आढळून आल्याची माहिती एसीबीने दिली होती. त्यांच्या धुळे येथील घरातून 27 तोळे सोने जप्त करण्यात आले होते. त्यांच्या बँकांचे पासबुकही ताब्यात घेण्यात आले आहे.

विसपुते यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवार रोजी कोठडीची मुदत संपल्यामुले त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे अधिकारी करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या