Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांदवड व देवळा दुष्काळ जाहीर करणेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदवड व देवळा दुष्काळ जाहीर करणेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदवड/उदय वायकोळे/पोलीस दक्षता लाईव्ह:- चांदवड तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून काही ठिकाणी उभी पिके पावसाअभावी वाया गेल्याचे चित्र आहे,अशीच काहीशी परिस्थिती देवळा तालुक्यात सुद्धा आहे.

दुष्काळाच्या उपाययोजना राबविण्यासाठी चांदवड व देवळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा याबाबत दि 03/10/2023 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ राहुल आहेर व भाजपा नाशिक लोकसभा प्रमुख श्री. केदा नाना आहेर यांनी निवेदन दिले.केदा नाना आहेर हे गेल्या एक ते दीड वर्षांपासून मतदारसंघात भेटीगाठी घेत असून गणपती देवी मंडळांना सुद्धा भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधल्याने चर्चेत आले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या