चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चांदवड नगरपरिषद प्रथम नगराध्यक्ष भूषणजी कासलीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड – देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ डिसेंबर रोजी येथील रेणुका लॉनस येथे पार पडणाऱ्या कार्यक्रमात माती परीक्षण, पाणी परीक्षण, दुधाळ जनावरां च्या दूधवाढीसाठी आयुर्वेदिक टॉनिक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
भूषण कासलीवाल हे नेहमीच आपला वाढदिवस विविध समाजउपयोगी उपक्रमांनी साजरा करत असतात. यंदा शेतकऱ्यांची निसर्गाने केलेली दयनीय अवस्था लक्षात घेऊन सर्व कार्यक्रम शेतकरी केंद्रित उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यात माती, पाणी परीक्षण, बदलती नैसर्गिक परिस्थिती व आजची शेती, देशी गोवंश जतन व संवर्धन, सेंद्रिय खते निर्मिती अन् वापर यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान या कार्यक्रमास नोंदणी करून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास घरच्याघरी माती, पाणी परीक्षण करता येईल असा एक किट, दुधाळ जनावरां च्या दूधवाढीसाठी आयुर्वेदिक टॉनिक मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या नोंदणीसाठी ९९२३७२२१७९, ९४२३१८१००८ हे क्रमांक जाहीर करण्यात आले असून यावर नोंदणी करणे आवश्यक आहे. शिवाय तरुणांसाठी रोजगार नोंदणी शिबिर देखील असल्याने नोंदणी करण्यात आलेल्या तरुणासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
या शिबिरास श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाचे गुरुमाऊली प. पू आण्णासाहेब मोरे, आणि सुपुत्र गणेश (आबासाहेब) मोरे, प्रगतिशील शेतकरी सिद्धार्थ केदारे आदी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. गुरुवार दिनांक २१ डिसेंबर रोजी रेणुका लॉनस येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नियोजित असणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भूषण कासलीवाल मित्र परिवाराने केले आहे.