Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeनाशिकचांदवड शहरात शिवस्मारक व शिवसृष्टी उभारण्यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर -...

चांदवड शहरात शिवस्मारक व शिवसृष्टी उभारण्यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर – आ. डॉ. राहुल आहेर

चांदवड/ उपसंपादक उदय वायकोळे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे शहरातील स्मारक भव्यदिव्य स्वरूपाचे व्हावे व शहरात शिवसृष्टी उभारली जावी अशी मनात संकल्पना होती. त्याअनुषंगाने नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत शिवस्मारक व शिवसृष्टी उभारण्याच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी आ. डॉ. राहुल आहेर यांनी मागणी केली होती.

काल झालेल्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नगरपरिषदांना वैशिष्ट्य पूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत चांदवड शहरातील शिवस्मारक व शिवसृष्टी उभारण्याच्या कामासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचे आ. डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले. तसेच शिवस्मारक व शिवसृष्टी एन. एच 752 जी चांदवड मनमाड रस्त्यावरील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उपाजिल्हा रुग्णालया समोर मंजूर झालेले भव्यदिव्य असे स्मारक व शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचे आ. डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या