Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावपडसोद येथील चार जणांविरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

पडसोद येथील चार जणांविरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव तालुक्यातील पडसोद येथे 24 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 9 वाजता गल्लीतून जाण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाला जातीवाचक शिविगाळ करून लोखंडी सळईने डोक्यात मारहाण करण्यात आली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि.24 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 9 वाजता ही घटना घडली असून, जळगाव तालुक्यातील पडसोद या गावात हा 30 वर्षीय तरुण परीवारासह वास्तव्याला आहे. हा तरुण त्यांच्या मामाच्या मुलासोबत गल्लीतून जात असताना संशयित आरोपी दिलीप देवराम पाटील राहत असलेल्या गल्लीत दिलीप पाटील याने दोघांचा रस्ता अडवून त्यांना थांबवून जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच त्याच्या सोबत असलेले संजय तुकाराम पाटील, निलेश दिलीप पाटील, दिलीप देवराम पाटील सर्व रा.पडसोद यांनी तरुणास मारहाण केली. यातील एकाने आपल्या हातातील लोखंडी सळईने तरुणाच्या डोक्यात वार केले व तरुणास गंभीर स्वरूपाची दुखापत केली.
जखमी झालेल्या तरुणाला महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री 11 वाजता तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिलीप देवराम पाटील, संजय तुकाराम पाटील, निलेश दिलीप पाटील, दिलीप देवराम पाटील सर्व रा. पडसोद, ता. जि. जळगाव. याच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या