Sunday, September 15, 2024
police dakshta logo
Homeअपघातअंजाळेजवळील मोर नदीनकीक अपघात; एकाचा दुर्दैवाने अंत

अंजाळेजवळील मोर नदीनकीक अपघात; एकाचा दुर्दैवाने अंत

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत आठ ते नऊ अपघात घडले असून त्यात मोटारसायकलच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. दरम्यान अपघातात सात जणांचे बळी गेले आहेत. यावल तालुक्यातील अंजाळे ते भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर चारचाकी व दुचाकी वाहनाचा अपघात होऊन यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली अधिकृत माहिती अशी की , यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाच्या मोर नदीवरील नवीन बांधलेल्या पुलावर शुक्रवार दिनांक २२ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास यावल कडुन भुसावळकडे जाणार्‍या मारूती ईको वाहन क्रमांक एमएच ०१ सी.पी ३२१८ या वाहनाने भुसावळकडून येणार्‍या मोटरसायकल क्रमांक एमएच १९ ई.डी ०४३२ या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये मोटरसायकल चालक राजू भिका शिंदे ( वय २५ वर्षे, रा. देऊळगाव गुजरी ता. जामनेर ) यांना या भिषण अपघातात गंभीर दुखापत होवून ते जागीच मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसर शोकाकुल झाला आहे.याबाबत विकास विश्वनाथ शिंदे (वय २५ वर्ष, रा. आमोदे, तालुका यावल) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्याने यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अपघातास आणि मोटरसायकल चालक राजू शिंदे यांच्या मृत्युस कारणीभूत मारूती ईको चारचाकी वाहन चालक सचिन संजय कोळी (रा. अंजनसोडा, तालुका भुसावळ ) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात अपघात,चोरीच्या घटना आणि हाणामारीच्या घटना वाढल्या असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या