जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चर्मकार विकास संघातर्फे भारतरत्न, संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी शनिवार, ६ डिसेंबर रोजी 257, भास्कर मार्केट येथे मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास चर्मकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ समाजबांधव काशीनाथ इंगळे, ज्ञानदेव भारुळे, प्रकाश रोजतकर, विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, राजेश वाडेकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून झाली. उपस्थित बांधवांनी पुष्पांजली अर्पण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
या वेळी समाजबांधवांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रनिर्मितीतील महान योगदानाची आठवण करून दिली. तसेच त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राचे महत्त्व सांगत तो जीवनात अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमास लिलाधर भारुळे, मनोजकुमार सोनवणे, कैलास वाघ, रवींद्र नेटके, शिवदास कळसकर, रघुनाथ डोळे, यशवंत सावकारे, बाबू खाटिक, गुलाब पाटील, संतोष माळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी काशीनाथ इंगळे, संजय वानखेडे, विश्वनाथ सावकारे, गुलाब पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

