Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटने संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वर्षा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटने संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.

शिवरायांच्या कर्तृत्वास व लौकीकास साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमावी. उभारल्या जाणाऱ्या पुतळ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या