विद्यार्थ्यांकडून पथनाट्य व नृत्य सादर; डॉ. विकास इंगळे प्रमुख पाहुणे
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- Chavra International School येथे छत्रपती Shivaji Maharaj यांच्या जयंतीनिमित्त उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित पथनाट्य आणि देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणातून स्वराज्य, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास इंगळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले.
शाळेचे मुख्याध्यापक फादर अँथोनी, उपमुख्याध्यापक फादर जेरी, सिस्टर सोपी, सिस्टर लिलीत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.चावरा इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या या शिवजयंती उत्सवाचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

