Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeशैक्षणिकनूतन प्राथमिक विद्यामंदिर चिनावल येथे पर्यावरण पूरक "श्रीगणेश मूर्ती" कार्यशाळा संपन्न

नूतन प्राथमिक विद्यामंदिर चिनावल येथे पर्यावरण पूरक “श्रीगणेश मूर्ती” कार्यशाळा संपन्न

चिनावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- गणेश उत्सव जवळ आला असून, समाजात पर्यावरण पूरक संदेश देण्याच्या उद्देशाने नूतन प्राथमिक विद्यामंदिर चिनावल येथे बाप्पाच्या आगमनासाठी आतुर असलेल्या चिमुकल्यांसाठी पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थांना तसेच शिक्षकांना सावदा येथील ललित भोरटके सर यांनी शाडू माती पासून गणपती कसा बनवायचा याविषयी छान मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता निर्माण केली.ललित भोरटके सर यांनी शाडू माती पासुन गणपती मूर्ती  कार्यशाळा घेतली असता चिमुकल्यांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला व आपल्या छोट्या छोट्या हातांनी बापाला आकार देऊन पर्यावरण पूर्वक मूर्ती बनवून समाजाला एक संदेश दिला.भविष्यात या विद्यार्थ्यांना मातीकाम चा हा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहणार यात शंकाच नाही.

पर्यावरण पूरक शाडू मातीचा गणपती बनवणे या कार्यशाळेसाठी विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे ललित भोरटक्के सर यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.कार्यशाळेप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील महाजन, चेअरमन विनायक कमलाकर महाजन, सचिव गोपाळ देवचंद पाटील व तसेच सदस्य यांनी भेट दिली व तसेच सदर कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नूतन प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर नूतन प्राथमिक विद्यामंदिर चिनावल तालुका रावेर यांनी शाळेच्या वतीने नूतन परिवाराचेही आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या