Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमचोपडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस अटक

चोपडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस अटक

चोपडा | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- शिरपूर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोपडा येथे दोन वर्षांपासून अत्याचार होत होता. पीडित मुलीचे पोटात दुखल्यावर दवाखान्यात उपचारासाठी आल्यावर ती गरोदर असल्याचे कळाले. त्यानंतर सदर पीडितेने तीच्यावर अत्याचार झाल्याची फिर्याद चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिली. आरोपीस रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी चोपडा येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्या मुलीवर अविनाश वेस्ता पावरा याने जानेवारी २०२३ मध्ये चोपडा शहरातील शिरपुर रोडवरील एका हॉस्पिटलच्या मागे असलेल्या पीडितेच्या मैत्रिणीच्या रुमवर चार वेळेस तसेच २६ जून २०२५ रोजी सकाळी ११वा च्या सुमारास शिरपुर रोडालगत असलेल्या हरेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाडा झुडपांमध्ये पीडितेवर अत्याचार केला.

सदर पीडितेने तीच्यावर अत्याचार झाल्याची फिर्याद चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिली म्हणुन अविनाश वेस्ता पावरा (रा.अंमलवाडी पोस्ट उमर्टी ता चोपडा) याच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या