Tuesday, October 21, 2025
police dakshta logo
Homeक्राईमअवैध गांजा वाहतूक करणारे दोघे इसम जेरबंद

अवैध गांजा वाहतूक करणारे दोघे इसम जेरबंद

२ लाख २८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या दोघा इसमांना सत्रासेन-चोपडा रोडवर अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २ लाख २८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदारामार्फत पोलीस पथकाला माहिती मिळाली होती की, सत्रासेन ते चोपडा जाणाऱ्या मार्गावर दोन इसम मोटारसायकलवर गांजा वाहतूक करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्ह े शाखा अधिकारी, अंमलदार तसेच Chopda Rural Police Station प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून सत्रासेन-चोपडा रोडवर सापळा रचण्यात आला.

वाहनांची तपासणी सुरू असताना संशयित मोटारसायकल क्रमांक MP-46-MV-2951 आढळली. ताबडतोब दोघा इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यात १) अविनाश साहेबराव दिवरे (वय २६, रा. खोकरी, पोस्ट धवली, ता. वरला, जि. वडवाणी), २) रोशन साहेबराव दिवरे (वय ३१, रा. खोकरी, पो. स्टे. धवली, ता. वरला, जि. वडवाणी) हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यातून ०८ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा, किंमत अंदाजे ₹१,७८,६४०/-, एक होन्डा कंपनीची मोटारसायकल, किंमत १४०,०००/-, एक मोबाईल फोन, किंमत ११०,०००/- , एकूण मुद्देमाल किंमत ₹२,२८,६४०/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात CCTNS क्र. ०२५६/२०२५, NDPS Act कलम २० (ब), २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. ही कारवाई स.पो.नि. शेषराव नितनवरे (चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन) व पोड.नि. जितेंद्र वल्टे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोह. विलेश सोनवणे, पोकॉ. रावसाहेब पाटील (स्थानिक गुन्ह े शाखा) तसेच पोह. राकेश पाटील, पो.कों. मनेष गावीत, पोको. प्रमोद पवार, पोकों. तिरुपती खांडेकर, पोकों. किरण पारधी (चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन) यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या