Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeअमळनेरचोपडा रस्त्यावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन तरुणांकडून दोन गावठी पिस्टल, सहा...

चोपडा रस्त्यावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन तरुणांकडून दोन गावठी पिस्टल, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोटरसायकली जप्त

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अवैध शस्त्रविक्रीवर अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन तरुणांना गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह पकडले आहे. या कारवाईत दोन मोटरसायकलींसह तब्बल 1 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेची माहिती अशी की, दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गुप्त माहिती मिळाली की, चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाजवळ दोन इसम गावठी पिस्टल विक्रीसाठी थांबले आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने तातडीने छापा टाकला. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यांना शिताफीने पकडले.

अटक करण्यात आलेल्यांची नावे विशाल भैय्या सोनवणे (18, रा. ढेकूसीम) व गोपाल भीमा भिल (30) अशी आहेत. त्यांच्या जवळून प्रत्येकी एक गावठी पिस्टल व प्रत्येकी तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. त्याचबरोबर त्यांच्या ताब्यातील एमएच 54 ए 354 क्रमांकाची मोटरसायकल तसेच बिननंबरची मोटरसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात शस्त्र कायदा कलम 3, 25 तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, मिलिंद सोनार, उदय बोरसे, निलेश मोरे आणि विनोद संदानशिव यांनी सहभाग नोंदवला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या