Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावचोपडा तालुक्यातील अबांडे येथील सुनीता भालेराव बसच्या बनल्या वाहक; अनेकांनी केले कौतुक..!

चोपडा तालुक्यातील अबांडे येथील सुनीता भालेराव बसच्या बनल्या वाहक; अनेकांनी केले कौतुक..!

चोपडा/ पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-  महिलांनी आम्हीही आता मागे नाहीत ,उलट पुरुषांच्या पुढेच आहोत हे सिद्ध केले आहे.आजच्या युगात महिला पुरुषाच्या खांदाला खांदा लावून काम करत आहे. कोणत्याच क्षेत्रात महिला वर्ग मागे नाहीत. याची प्रचिती रोजच्या जीवनात दिसतं असते.धकाधकीच्या जीवनात देखील आपले घर सांभाळून पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतात.

चोपडा तालुक्यातील अबांडे येथील सुनीता भालेराव हे आगारात पहिल्यांदाच महिला वाहक आल्याने बघ्याची एकच गर्दी झाली. सुनीता भालेराव नामक महिला वाहक नवीनच प्रशिक्षण घेऊन चोपडा आगाराला त्यांची नियुक्ती झाली.नियुक्त झाल्यावर त्यांनी प्रथमच खेडीभोकरी अशी बस चालवली आणि प्रवाशांना सुखरूप सोडले . अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

अत्यंत सामान्य कुटुंबातील सुनिता भालेराव यांनी जेमतेम शिक्षण पूर्ण करून बसचे स्टेरिंग हातात धरले. त्यांचे स्वागत येथील आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले. त्यासह अनेक प्रवाशांसह गोरगावले येथील महिलांनी सुनीता भालेराव यांचे स्वागत केले ,आणि पुढील जीवनाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या